आमच्याविषयी

हाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हि एक सामाजिक सांस्कृतिक संघटना आहे. ही पत्रकारांची श्रमिक संघटना नाही, मात्र पत्रकार, संपादक, वृत्पपत्राचे मालक, छायाचित्रकार यांची एकत्रित अशी संघटना आहे. जी आपसात विचारांची देवाण-घेवाण मनमोकळेपणाने करताना सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात जोमानं कार्य करीत आली आहे. मराठी भाषेचा आदर करणे, मराठीची प्रतिष्ठा वाढविणे, मराठी भाषिकांचा सन्मान करणे त्याचबरोबर भारतीय संस्कृतीही जोपासणे, याकडे मराठी पत्रकार संघ जाणीवपूर्वक लक्ष देत आला आहे. मराठी वर्तमानपत्र ज्यांनी सर्वप्रथम सुरु केले त्या दर्पण शास्री बाळशास्री जांभेकरांचा स्मुतीदिनी ६ जानेवारी हा महाराष्ट्राचा, मराठी वृत्पत्रांचा पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रभर साजरा करणारी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हि एकमेव संघटना आहे. महाराष्ट्रभरतील पत्रकारांमधून चांगले विशेष काम करणाऱ्या पत्रकारांचा पुरस्कार देऊन सन्मान करणे, मराठी सिनेनाट्यसृष्टीतील मराठी कलावंतांचा पुरस्कार देवून सत्कार करून गौरव करणे त्याचबरोबर महाराष्ट्र ही कर्मभूमी बनवून महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा लौकीक वाढवणाऱ्या अन्य भाषिक कलावंतांचाही सन्मान करणे याकडे पत्रकार संघाने विशेष लक्ष पुरविले आहे. चांगले, लोकप्रिय लोकप्रतिनिधी, कर्तुत्ववान शासकीय, निमशासकीय अधिकारी यांचीही दखल घेत त्यांचाही गौरव पत्रकार संघ करीत आला आहे. जात-पात, प्रांत यांचा कोणताही भेद मानता महाराष्ट्र माझा सर्वांच्या प्रेमाचा, आपुलकीचा हा संदेश देण्याचा प्रयत्न करताना तो मराठीच्या उत्कर्षाकडेही वाटचाल करू पाहत आहे. पत्रकारांसाठी आरोग्य विमा, अपघातग्रस्त पत्रकारांना मदत, पत्रकारांच्या निवासासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न, असे उपक्रम पत्रकारसंघ राबवत आहे.

मुख्य कार्यालय

विजयश्री को-ऑप.हौसिंग सोसा.,
५ वा मजला, तात्या घरापुरे मार्ग,
गिरगाव-मुंबई